विराट कोहली होणार मुंबईकर

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच मुंबईकर होणार आहे. विराटने मुंबईत वरळी येथे जुन्या पासपोर्ट ऑफिसमागे असलेल्या ओमकार टॉवरमध्ये ३४ कोटी रुपयांचे आलीशान घर खरेदी केले आहे. टॉवरच्या सी विंगमध्ये ३५व्या मजल्यावर विराटने ७,१७१ चौ. फुटांचे पाच बेडरुमचे घर खरेदी केले आहे. याच इमारतीत २९व्या मजल्यावर युवराज सिंहने घर खरेदी केले आहे.