विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ‘वेगा’ची धार वाढली, वाचा खास आकडेवारी

1040

एकेकाळी कमकुवत समजली जाणारी टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी धारधार झाल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटीतही टीम इंडियाच्या वेगापुढे विरोधी संघ कोसळला. दोन्ही डाव मिळून टीम इंडियाच्या पेसर्सने एकूण 13 बळी घेतले. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या त्रिकुटाने बांगलादेशला झटपट बाद करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

गेल्या काही वर्षात टीम इंडियाने कसोटीमध्ये मिळवलेल्या यशामध्ये वेगवान गोलंदाजांचा वाटा मोठा आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जयप्रीत बुमराह, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांना देशासह विदेशातही आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाच्या वेगाची धारी आणखी वाढल्याचे दिसून येते.

ICC Ranking – शमी कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला

टीम इंडियाने गेल्या 10 कसोटीमध्ये विरोधी संघाच्या 186 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 123 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. यावरून टीम इंडियाच्या वेगाची धार आणि स्विंगची ताकद वाढत असल्याचे दिसते. टीम इंडियाने गेल्या 10 लढतीत 8 विजय मिळवला आहे. यात वेगवान गोलंदाजांनी 102 विकेट्सचे योगदान दिले आहे. तर अश्विन आणि जाडेजाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या फिरकी गोलंदाजांनी 54 बळी घेतले आहेत.

शमीचा दबदबा
टीम इंडियाचा हुकुमाचा एक्का मोहम्मद शमी गेल्या 10 कसोटी सलगपणे खेळणारा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. शमीने या 10 कसोटीत 18.42 च्या सरासरीने 45 बळी घेतले आहेत. शमीसह बुमराहने 6 लढतीत 34, इशांतने 8 लढतीत 27 आणि उमेश यादवने 4 लढतीत 17 बळी घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या