`विराट’ झेप! कोहली बनला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला जगातील चौथा खेळाडू

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावर उत्तुंग झेप घेतली आहे. इन्स्टाग्राम या सोशल साईटवर सात कोटी फॉलोअर्स असलेला विराट कोहली हा पहिला हिंदुस्थानी व्यक्ती ठरला आहे. तसेच सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगातील चौथ्या खेळाडूचा मानही त्याने पटकावला आहे. खिस्तियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी व नेयमार या फुटबॉलपटूंनंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो हे विशेष. विराट कोहलीने यावेळी बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (6.90 कोटी) याला लीलया मागे टाकले.

लॉकडाऊनमध्ये रोनाल्डोची कमाई 18 कोटी

लॉकडाऊनमध्ये खेळाडूंनी सोशल साईटद्वारे कोट्यवधींची कमाई केली. खिस्तियानो रोनाल्डो याचे 23 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असून त्याने या कालावधीत 18 कोटींची कमाई केली. लियोनेल मेस्सीने 12.3 कोटींची, तर नेयमारने 11.4 कोटींची कमाई केली. विराट कोहलीने तीन स्पॉन्सर पोस्टद्वारे 3.6 कोटी कमवले.

सर्वाधिक कमाईत फेडररच अव्वल

दोन महिन्यांपूर्वी फोब्र्सकडून जगामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर 802 कोटींसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. खिस्तियानो रोनाल्डो 793 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे. लियोनेल मेस्सी व नेयमार अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत. या यादीत विराट कोहली 196 कोटींसह 66व्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या