विराट कोहलीने केली चाहत्यांसाठी भावूक पोस्ट

33

सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर विराट कोहलीच्या संघावर चौफेर टीका होत आहे. कर्णधार विराटवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच दरम्यान लॉर्डस कसोटीमध्ये एक डाव आणि 159 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराटने फेसबूकवर चाहत्यांना उद्देशून एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

बीसीसीआयच्या रडारवर शास्त्री आणि कोहली

‘कधी आपण जिंकत असतो तर कधी आपण शिकत असतो… तुम्ही कधीच आमची साथ सोडली नाही आणि आम्हीही तुमच्या आशा-आकांक्षावर खरे उतरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चढ-उतारावेळी तुम्ही आमच्या सोबत राहिले आहेत’, असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली तर वन डे मालिका 1-2 अशी गमावली. सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 2-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने 31 धावांनी आणि एक डाव आणि 159 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न विराट आणि कंपनीचा असणार आहे.

Summery  – Virat Kohli emotional post after lords test

आपली प्रतिक्रिया द्या