विराट कोहलीने घेतली करोनाची लस, इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही लस घेतली आहे. याआधी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनाही कोरोनीची लस घेतली आहे.

टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. या दौर्‍यापूर्वी संघातील खेळाडूंना कोरोनाची लस दिली जात आहे. टीम इंडिया 18-22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर, इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

कोहलीने लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने लोकांनाही कोरोनावरील लस घेण्याचे आवाहन केले आहे. हा फोटो शेअर करताना विराट कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लवकरात लवकर लस घ्या.’ दरम्यान, वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही कोरोनाची लस घेतली आहे. इशांत आणि त्यांची पत्नी प्रतिमा यांनी लसीकरण केंद्राचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या