पत्रकाराच्या ‘बेस्ट’ प्रश्नावर विराटचा रागाराग; म्हणाला, हे तुमच्या …

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत टीम इंडियाला 4-1 असा दणदणीत पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीचे संतुलन ढासळताना दिसले. ओव्हलवर झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषदेमध्ये पत्राकरांच्या तिखट प्रश्नांचा सामना विराटला करावा लागला. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर संयम गमावलेल्या विराटने उत्तराऐवजी प्रतिप्रश्न करत रागाराग व्यक्त केला.

इंग्लंडने पाचव्या कसोटीसह मालिका 4-1ने जिंकली

संपूर्ण कसोटी मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला जोरदार टक्कर दिली. या दरम्यान टीम इंडियावर गेल्या 15 वर्षातील सर्वोत्तम टीम असल्याचा शिक्का मारला गेल्याचा दबाव होता का? तुला खरंच असं वाटतं का की ही गेल्या 15 वर्षातील सर्वात सर्वोत्तम टीम आहे? याचा प्रश्नावर विराटने आपले संतुलन गमावले आणि पत्रकाराला प्रतिप्रश्न विचारला.

हो, मला विश्वास आहे की आम्ही सर्वोत्तम आहोत. तुम्हाला काय वाटतं? असा प्रतिप्रश्न विराटने पत्रकाराला केला. यावर पत्रकाराने मला असं वाटत नाही असे उत्तर दिले. यावर विराट रागात म्हणाला की, हे तुमचं मत आहे. विराटच्या रागारागाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे टीम इंडियाच्या कामगिरीवर टिकाकारांनी सवाल उपस्थित केल्यानंतर प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्यांच्या टीमचा विक्रम गेल्या 15-20 वर्षामध्ये खेळलेल्या टीमपेक्षा चांगला असल्याचे म्हटले होते. इंग्लंडच्या दौऱ्यावर टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकल्यानंतर एक दिवसीय आणि कसोटी मालिका गमावली.