विराट कोहलीने धोनीचा विक्रम मोडला; डू प्लेसिस, विलियम्सन यांच्या पंक्तीत स्थान

730

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टनच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेल्या हिंदुस्थानच्या संघाने हॅमिल्टनमध्ये प्रथम फलंदाजी करताना 179 धावा केल्या. हिंदुस्थानच्या डावात रोहित शर्माने 65 आणि कर्णधार विराट कोहलीने 38 धावांचे योगदान दिले. या खेळीसह कर्णधार विराट कोहली याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडला आहे.

हॅमिल्टन येथील न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात विराट कोहलीने 25 वी धाव घेताच महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाला पिछाडीवर टाकले आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटच्या नावावर 1125 धावांची नोंद झाली आहे, तर महेंद्रसिंह धोनीच्या नावावर 1112 धावांची नोंद आहे. या यादीत पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाप डू प्लेसिस असून त्याच्या नावावर 1273 धावा आहेत, तर 1148 धावांसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुसऱ्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या