विराट आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

38

सामना ऑनलाईन । मुंबई

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सध्या तो ज्या संघाकडून खेळतो त्या रॉयल चॅलेन्जर्स बेंगरुळुनं त्याला १७ कोटींना पुन्हा संघातं समाविष्ट केलं आहे. तर दुसरीकडे रायझिंग पुणे जायंटस्ने इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सला १४.५ कोटींनी खरेदी केलं. विराटला रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरूनं संघात कायम ठेवलं असून १७ कोटी हे त्याचे या मोसमातील मानधन असणार आहे

आधीच्या मोसमात बेन स्टोक्स हा सगळ्यात महागडा खेळाडू होता, यंदाच्या मोसमात स्टोक्सला मागे टाकत चेन्नई सुपरकिंग्सचा महेद्रसिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सचा रोहीत शर्मा पुढे निघून गेले आहेत. या दोघांना १५ कोटींचं मानधन देत त्यांच्या संघांनी कायम ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू आणि कर्णधार गौतम गंभीरला मात्र या मोसमात धक्का बसला असून, त्याच्याकडे असलेलं कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधार पद काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे गंभीरचा आयपीएलच्या लिलावामध्ये समावेश होणार आहे.

राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाचे कर्णधार स्टिव्ह स्मिथला संघात समाविष्ट केलं आहे, तर डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमारला सनरायजर्स हैदराबाद संघात कायम ठेवलं आहे. फ्रॅन्चायजी जर तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंला कायम ठेवत असेल तर त्यांना पहिल्या खेळाडूला १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूला ११ कोटी आणि तिसऱ्या खेळाडूला ७ कोटी मिळतात. जर दोन खेळाडूंना संघात कायम ठेवलं तर पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी द्यावे लागतात तर दुसऱ्या खेळाडूला ८.५ कोटी द्यावे लागतात.

आपली प्रतिक्रिया द्या