#INDvSA विराटची ‘ती’ कृती आयसीसीला खटकली, निलंबनाची टांगती तलवार

1962

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसरा टी-20 सामना रविवारी खेळला गेला. या लढतीत आफ्रिकेने हिंदुस्थानचा 9 विकेट्स राखून दारूण पराभव केला. आफ्रिकेच्या या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीमध्ये सुटली. मालिका बरोबरीत सुटली असली तरी टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीची सामन्यादरम्यानची एक कृती आयसीसीला खटकली आहे. विराट कोहलीने फलंदाजीदरम्यान केलेल्या गैरव्यवहाराचा फटका त्याला बसण्याची शक्यता आहे.

पंतचे करावे तरी काय? लक्ष्मणने दाखवला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ मार्ग

सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडू, पंच किंवा इतर व्यक्तींना अयोग्यपणे धक्का दिल्यास खेळाडूवर कारवाई होते. आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत कर्णधार विराट कोहली याने फलंदाजीदरम्यान नियमांचा भंग केल्याचे सामनाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले. या प्रकरणी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी त्याला शिस्तभंगाचा एक गुण (Demerit Point) दिला आहे. विराटकडून आयसीसीच्या Level 1 मधील 2.12 नियमाचा भंग झाला आहे. त्यामुळे विराटवर सध्या निलंबनाची टांगती तलवार दिसत आहे.

कधी घडला हा प्रकार

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ब्युरेन हेंड्रिग्ज धाव घेताना धक्का दिला होता. हा प्रकार सामनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. सामना संपल्यानंतर सामनाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये विराट कोहलीने आपली चूक मान्य केली.

नियम काय सांगतो?

दरम्यान, विराट कोहलीच्या खात्यात सध्या शिस्तभंगाचे 3 गुण (Demerit Point) जमा आहेत. कोणत्याही खेळाडूने 4 गुणांचा टप्पा ओलांडला तर त्याच्यावर 1 कसोटी किंवा 2 टी-20 किंवा एक दिवसीय सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या