विराटने घेतली होती जेटलींची बाजू

405

आम आदमी पक्षाने डीडीसीएमधील कारभारावरून अरुण जेटली यांच्यावर 2015 मध्ये बेताल आरोप केले होते.  यावेळी विराट कोहलीने जेटली यांची बाजू घेऊन ते संघटनेचे अध्यक्ष असल्याबाबत समाधान व्यक्त केले होते. खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि क्रिकेटपटूंना मदत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याचे ट्विट कोहलीने केले होते. जेटली यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला असून खूप दुःख झाले. ते खरंच खूप चांगले होते. ते नेहमी इतरांना मदत करत. माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते वेळात वेळ काढून माझ्या घरी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आले होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे  ट्विट करत वेस्ट इंडीज दौऱ्यावर असणारा हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आपली प्रतिक्रिया द्या