कसोटी इतिहासात पहिल्यांदाच जर्सीवर नाव आणि नंबर; टीम इंडियाचे फोटोशूट

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज संघात गुरुवारी 22 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. टीम इंडियाचे कसोटी चॅम्पियनशीपचे अभियानही वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीपासून सुरू होणार आहे. या कसोटीपूर्वी टीम इंडियाने फोटोशूट केले. या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे खेळाडूंच्या जर्सीवर पहिल्यांदाच नाव आणि नंबर एकसाथ लिहिण्यात आले आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, टीम इंडियाचा वॉल चेतेश्वर पुजारा यांच्यासह 16 सदस्यीय खेळाडूंनी फोटोशूट केले. यातील काही खेळाडूंनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहे. विराट कोहलीच्या जर्सीवर त्याचे नाव आणि 18 नंबर दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या