स्वप्नातही ‘पिंक बॉल’ पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेला विराट, धवनने केले ट्रोल

4413

टीम इंडिया कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्ध आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. 22 नोव्हेंबरपासून हा ऐतिहासिक सामना सुरू होणार आहे. पिंक बॉलने होणाऱ्या या पहिल्या डे-नाईट कसोटीसाठी चाहत्यांसह टीम इंडियाचे खेळाडूही उत्साही आहेत. उत्साह एवढा शिगेला पोहोचला आहे की खेळाडूंच्या स्वप्नातही आता पिंक बॉल येत आहे.

टीम इंडियाचे आघाडीचा फलंदाज आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला आता स्वप्नातही पिंक बॉल दिसत आहे. नुकताच रहाणेने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवरून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांनी रहाणेला ट्रोल केले आहे.

रहाणेने इस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो झोपलेला दिसत असून शेजारी पिंक बॉल ठेवलेला दिसत आहे. या फोटोसोबत रहाणेने ‘ऐतिहासिक पिंक बॉल टेस्टचे आता स्वप्नही पडू लागले आहेत’, असे कॅप्शन दिले आहे. रहाणेच्या या फोटोवरून विराट आणि धवनने त्याची चांगलीच खेचली आहे. विराटने रहाणेच्या फोटोवर ‘जबरदस्त पोज जिंक्सी’, अशी कमेंट केली आहे.

kohli

कर्णधार विराटसह धवनही रहाणेची खेचण्यात आघाडीवर आहे. रहाणेची खिल्ली उडवताना धवनने, स्वप्नातही फोटो काढला काय… अशी कमेंट केली आहे. याला उत्तर देताना रहाणेही मागे राहिला नाही. रहाणेने ‘स्वप्नात नाही तर आपल्या माणसाने फोटो काढलाय’, असे उत्तर दिले आहे.

dhavan

दरम्यान, डे-नाईट कसोटीसाठी कोलकाता आणि इडन गार्डन्स गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार होण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना उपस्थित राहणार आहेत. या सामन्यासाठी बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने विशेष तयारी केली आहे.


View this post on Instagram

Already dreaming about the historic pink ball test

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

आपली प्रतिक्रिया द्या