कोहलीच्या ‘बाऊन्सर’वर रिचर्डस् यांचा षटकार

673

वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सर व्हिव्ह रिचर्डस् यांची मुलाखत घेतली. बीसीसीआयने या मुलाखतीतील पहिला भाग संकेतस्थळावर पोस्ट केला आहे. यात कोहलीने विचारलेल्या ‘बाऊन्सर’च्या प्रश्नाला रिचर्डस् यांनी ‘षटकार’ ठोकल्याप्रमाणे बाणेदार उत्तर दिले.

विराटने या मुलाखतीत सर व्हिव्ह रिचर्डस् यांना बाऊन्सरबद्दल प्रश्न विचारला. ‘क्रिकेटमध्ये निर्भीड खेळाडू म्हणून तुमची ओळख होती. सुरुवातीला तुम्ही कोणीच हेल्मेट घालून खेळत नव्हतात. पण नंतर जेव्हा हेल्मेट वापरण्याची सुरुवात झाली तेव्हादेखील तुम्ही कधीच हेल्मेट वापरले नाहीत. तुम्हाला बाऊन्सर चेंडूची भीती वाटली नाही का?’, असा प्रश्न विराटने त्यांना विचारला. ‘मी एक बिनधास्त क्रिकेटपटू आहे. माझं हे वाक्य कदाचित तुम्हाला उद्धटदेखील वाटेल, मात्र माझा स्वतःच्या खेळावर कायम विश्वास होता. हेल्मेट घालणं मला कधीही आवडलं नाही. कारण हेल्मेट घालणं मला फार अडचणीचं वाटायचं. मला विंडीजची मरून रंगाची टोपी होती ती घालताना खूप अभिमान वाटायचा. जर चेंडू लागायचा असेल तर ते माझं नशीब आणि देवाची मर्जी, असा विचार मी कायम करायचो’, अशा शब्दांत रिचर्डस् यांनी उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या