“कोहली सचिनच्या शतकांचा विक्रम मोडणार, वर्ल्ड कपही जिंकणार”

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेले ज्योतिषी नरेंद्र बुंदे यांनी हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली बाबत भविष्यवाणी केली आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घालणार आहे. तसेच जाहिरातीत असे करार करेन की त्यातही सगळे रेकॉर्ड्स मोडतील. गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या खेळण्यावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यावेळी बुंदे यांनी धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळेन अशी भविष्यवाणी केली होती.

नरेंद्र बुंदे यांनी ताजी भविष्यवाणी अशी केली आहे की, विराट २०२५ पर्यंत टी-२० वर्ल्ड कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप हिंदुस्थानला जिंकून देईल. याशिवाय सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा रेकॉर्डही विराट मोडेल अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे.

सचिन तेंडुलकर दुखापतीतून वापसी करेन, सचिनला भारतरत्न सन्मान मिळेल, सौरव गांगुलीची वापसी आणि हिंदुस्थान २०११चा वर्ल्ड कप जिंकेल अशी भविष्यवाणी केली होती. याआधी बुंदे यांनी अनेक क्रिकेटपटूंना सल्ले दिले आहेत. ज्यामध्ये सौरव गांगुली, मुरली कार्तिक, एस. श्रीसंत, जहीर खान, गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या