‘वन डे’मध्ये विराट 75 ते 80 शतक ठोकणार! माजी सलामीवीर खेळाडूची भविष्यवाणी

877

वेस्ट इंडीजविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने एक दिवसीय कारकीर्दीतील 42 वे शतक झळकावले. विराटच्या या शतकी खेळीचे सर्वांनी कौतुक केले आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वसिम जाफर यानेही विराटवर कौतुकाची स्तुतिसुमने उधळली असून एक भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली आपल्या एकूण एक दिवसीय कारकीर्दीत 75 ते 80 ठोकणार असल्याचे जाफरने म्हटले आहे.

विराट पराक्रम! दुसऱ्या वनडेत कर्णधार कोहलीचे विक्रम

दुसऱ्या एक दिवसीय लढतीत विराटने 120 धावांची शतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 279 धावा रचल्या. त्यानंतर विंडीजचा डाव झटपट गुंडाळत 59 धावांनी विजय मिळवला. विराटचे हे 42 वे शतक होते. 10 एक दिवसीय लढतीनंतर विराटने शतक झळकावल्याने त्याला आनंद काही औरच होता. विराटच्या या खेळीनंतर वसिम जाफरने ट्वीट करून त्याचे अभिनंदन केले आहे.

‘आणखी एक आंतरराष्ट्रीय शतक. 11 डावानंतर पुन्हा विराट पूर्वपदावर आला आहे. विराट एक दिवसीय क्रिकेटमध्ये 75 ते 80 शतक ठोकेल असे मला वाटते’, असे ट्वीट वसिम जाफरने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या