#HappyBirthday मुलतानचा ‘सुलतान’! वाचा सेहवागचे काही खास विक्रम…

690

टीम इंडियाचा माजी सलामीवर खेळाडू विरेंद्र सेहवाग याचा आज 41 वा वाढदिवस आहे. आक्रमकतेचे दुसरे नाव असलेला, गोलंदाजांवर दहशत निर्माण करणाऱ्या सेहवागने 2015 मध्ये आपल्या 37 व्या वाढदिवशी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडियाकडून खेळताना सलामीला येऊन गोलंदाजांची हवा टाईट करणाऱ्या मुलतानच्या ‘सुलतान’ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही सेहवागच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. वयाच्या या टप्प्यावरही सेहवाग सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याच्या चाहत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. जाणून घेऊनच्या त्याच्या काही खास विक्रमांची माहिती…

कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक सरासरीने मोठी खेळी साकरण्याचा अनोखा विक्रम विरुच्या नावावर आहे. 2008 मध्ये चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विरुने 104.93 च्या सरासरीने 319 धावा चोपल्या होत्या.

virender-sehwag1

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा 290 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम विरुच्या खात्यावर जमा आहे. ब्रॅडमन यांनी 334, 334 आणि नाबाद 299 धावा चोपल्या होत्या, तर विरुने 319, 309 आमि 293 धावा करत त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

virender-sehwag2

सर्वाधिक कमी चेंडूत त्रिशतक ठोकण्याचा विक्रमही विरुच्या नावावर आहे. याशिवाय कसोटीत त्रितशक आणि वन डेमध्ये द्विशतक करणारा विरु जगातील पहिला फलंदाज आहे. विरुसह वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यानेही अशी कामगिरी केली आहे.

virender-sehwag5

कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 10 द्विशतकांमध्ये विरुच्या पाच खेळींचा समावेश होतो. विरुने कसोटीत सलग 11 अशी शतकं झळकावली आहेत ज्यात त्याने 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

virender-sehwag4

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या खेळाडूत विरुचा पहिला नंबर लागतो. विरुने आफ्रिकेविरुद्ध एकाच दिवशी 284 धावा चोपल्या होत्या.

virender-sehwag3

आपली प्रतिक्रिया द्या