कॉ. पानसरे हत्या प्रकरणी संशयीत आरोपी तावडेला जामीन मंजूर

18

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या यांच्या प्रकरणातील संशयीत आरोपी विरेंद्र तावडे याला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने तावडे याला २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जून २०१६पासून तावडे पोलिसांनच्या ताब्यात आहे. मात्र त्याच्याविरोधात सबळ पुरावे दाखल करण्यास अपयश आल्याने कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

संशयीत आरोपी तावडे यास जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. या अटीनुसार तावडे याला आपला पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागेल. तसेच त्याला कोल्हापूरात जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, तसेच दर शनिवारी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावावी, असे आदेशही वीरेंद्र तावडेला देण्यात आले आहेत.

याआधी सुमारे दोन वर्षांच्या चौकशीनंतरही समीरचा हत्येत थेट सहभाग असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले होते. तपासातील या त्रुटींची गंभीर दखल घेत न्यायालायाने समीर गायकवाडला जामीन मंजूर केला होता. गायकवाड याच्यानंतर दुसरा संशयीत आरोपी तावडे यालाही जामीन मंजूर झाल्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थीत होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या