कन्या

2595

‘‘प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. प्रयत्नाने समृद्ध झालेल्या माणसाला उशिरा का होईना फळ मिळतेच.’’

तणावाचा कालावधी संपून तुम्ही नव्या दिशेने वाटचाल करणार आहात. नानविध प्रसंगातून तुम्ही तुमची वाटचाल केली आहे. साडेसातीतील दिव्य अनुभव तुमच्या गाठीशी आहे. त्यामुळे दूरदृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. राजकारण असो समाजकारण तुमची प्रतिमा उजळेल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. मैत्री होईल. कुटुंबातील आनंदाचे क्षण भरभरून उपभोगता येतील. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शत्रू मैत्रीची अपेक्षा ठेवतील. वर्षभर गुरू महाराज तुमच्या (कन्या) राशीत राहणार आहेत.

२६ जाने २०१७ ला शनि धनुराशीत म्हणजे कन्येच्या सुखेषात येणार आहे. जूनमध्ये शनी वक्री होऊन वृश्चिकेत येत आहे व नंतर २६ ऑक्टोबर २०१७ ला शनी मार्गी होऊन धनुमध्ये येत आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत तुम्हाला वेगळय़ाच प्रकारची प्रगतीची संधी मिळेल.

१८ ऑगस्ट २०१७ ला कर्क राशीत राहू व मकर राशीत केतू प्रवेश करीत आहे. तुमच्यासाठी हा बदल फायदेशीर ठरेल. नवे अनुभव येतील. कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल. योग्य सल्ल्याने निर्णय घेतल्यास जीवनात स्थैर्य येईल. कौटुंबिक सुख वाढेल. विवाहाचा योग येईल.

१२ सप्टेंबर २०१७ ला गुरू तुला राशीत प्रवेश करीत आहे. क्षेत्र कोणतेही असो अतिशयोक्ती नको. धाडसाचे कौतुक होईल. मनात राहून गेलेले स्वप्न पूर्ण होईल. परदेश प्रवास, अधिकार व उज्ज्वल यश याचे धनी व्हाल. शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करू शकाल. पुढील फलिताचा वेध सविस्तर पुढे पाहू या. प्रयत्न करा व आत्मसन्मान मिळवा.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधकांना जेरीस आणता येईल. अधिकारात वाढ होईल. आरोप संपवता येतील. तुमच्या जुन्या अनुभवात नवीन भर घालून कार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करा. योजना तयार करून कार्यान्वित करा. नव्या युगाच्या पद्धतीने नवे डावपेच खेळणे जरुरीचे असते. तसेच नव्या पद्धतीने समाजाचा विकास करणेही गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक दिवस हा प्रगतीकडे नेणारा ठरेल. थांबू नका. प्रयत्नांची घोडदौड चौफेर करा. यशाची माळ तुमच्या गळय़ात पडेल. लोकसंग्रह वाढवा. लोकप्रियतेसाठी योग्य धोरण ठरवा. मार्चमध्ये जुने प्रकरण उकरून काढले जाईल. एप्रिल, मेमध्ये तुमच्यावर आरोप येऊ शकतो. शेतकरीवर्गाला मानाचे स्थान मिळवून देता येईल.

नोकरी-व्यवसाय:

नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. ताणतणाव व समस्या कमी होतील. परदेशी जाण्याचा योग येईल. धंद्यासाठी कर्जाचे कामे होऊ शकेल. या वर्षात जेवढी मेहनत घ्याल तेवढाच फायदा पुढील वर्षात होईल. शेतकरी वर्गाचा उत्साह वाढेल. मालाच्या खरेदी-विक्रीत फायदा होईल. परंतु या वर्षाचा अनुभव मात्र पुढील काळासाठी अधिक फायदेशीर ठरेल. छोटय़ा संकटाला मात्र घाबरू नका. डिसेबर, फेब्रुवारी, मार्च व मेमध्ये नोकरी, धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. जानेवरी, एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये चांगले पद मिळेल. शुभ समाचार मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. शेअर्समध्ये योग्य कंपनीत योग्य सल्ल्याने गुंतवणूक केल्यास पुढील दिवाळीत तुम्ही फार मोठा फायदा मिळवाल.

विद्यार्थी व तरुणवर्गासाठी:

मागील वर्षातील अपयश पुसून टाकण्याची संधी ग्रह तुम्हाला देतील. तेव्हा सज्ज व्हा. आळस सोडून उच्च शिक्षणाची पदवी मिळवा. या वर्षातील परीक्षेत चांगले मार्क मिळतील. परदेशी शिक्षणाची, नोकरीची संधी मिळेल. वडीलधाऱया व्यक्तींचा अपमान न करता त्यांच्या अनुभवाचा व सल्ल्याचा तुम्ही योग्य उपयोग करून घेतला तर पार मोठे यश तुमच्या हाती लागेल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व ऑगस्टमध्ये येणाऱया परीक्षेला जास्त मेहनत घ्या. उदास होऊ नका व फाजिल आत्मविश्वास ठेवू नका.

महिला वर्ग:

मनमोकळय़ा वृत्तीने गप्पा करण्याचा तुमचा स्वभाव आहे. सहज प्रेमाने तुम्ही इतरांना आपलेसे करता. मागील वर्षात गैरसमज, वाद व आर्थिक फसगत झाली असेल. तुमच्या गाठीशी आता अनुभव आहे. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही जीवनाला वळण देऊ शकाल. धंदा, नोकरी अथवा तुमचे क्षेत्र यात पुढे जाता येईल. डिसेंबरमध्ये मनस्ताप होईल. मार्चमध्ये वाद व संताप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. ऑगस्टमध्ये वेगळीच समस्या येऊ शकते. चिंता नको. चिंतनाने फायदा होईल.

आपली प्रतिक्रिया द्या