खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता

25
udayanraje

सामना प्रतिनिधी । सातारा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे. एका खंडणी प्रकरणात कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. याआधी याच प्रकरणात ९ जणांना अटक झाली आहे. प्रकरणातील सर्व पुरावे तपासून निर्णय घेऊ, अशी माहिती दिलीय कोल्हापूर रेंजचे विशेष आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे असंही नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.

काय आहे उदय राजेंवरचे खंडणीचे प्रकरण?

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा २२ मार्चला सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा ९ साथीदारांना पोलिसांनी अटक करून सातारा जिल्हा न्यायालायात हजर केले होते. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली, मात्र उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकत होती. मात्र, गेली २ महिने ही अटक होऊ शकलेली नाही. उदयनराजे सध्या साताऱ्यात देखील नाहीत, त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या