आनंदची कार्लसनवर मात

26

सामना ऑनलाईन । रियाद

हिंदुस्थानच्या विश्वनाथन आनंदने जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ‘नंबर वन’ असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. नवव्या फेरीत उभय खेळाडूंची गाठ पडली. ४८ वर्षीय आनंदने काळ्या सोंगटय़ांनी खेळताना आक्रमक सुरुवात केली. याचाच त्याला फायदा मिळाला. आनंदच्या अनपेक्षित आक्रमणामुळे २७ वर्षीय कार्लसनवर दबाव आला. शेवटी ३४ चालींच्या या लढतीत आनंदने कार्लसनवर सनसनाटी विजय मिळविला. आतापर्यंत झालेल्या ९ फेऱयांमध्ये आनंद अजिंक्य आहे. यापैकी त्याने पाच लढती जिंकल्या असून चार लढती बरोबरीत सोडविल्या.

आपली प्रतिक्रिया द्या