अभिनेता विवेक ओबेरॉयच्या जुहूतील घरावर बंगळुरू पोलिसांची धाड

बॉलीवुड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरावर बंगळुरू पोलिसांनी धाड टाकली आहे. बंगळुरू पोलिसातील दोन निरीक्षक दुपारी 1 विवेक ओबेरॉय याच्या घरी दाखल झाले. विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अलवा याचा शोध बंगळुरू पोलीस घेत आहेत. यासंदर्भात सर्च वॉरंट घेऊन पोलीस विवेक ओबेरॉय याच्या जुहू येथील घरी पोहोचले.

एका पोलीस अधिकाऱ्याने यासंदर्भात आजतकला माहिती दिली. ‘आदित्य अलवा फरार आहे. विवेक ओबेरॉय त्याचे नातेवाईक आहेत आणि आम्हाला माहिती मिळाली आहे की अलवा इथे आला आहे. त्याचा तपास करण्यासाठी आम्ही येथे दाखल झालो आहोत. त्याकरता कोर्टातून वॉरंट घेण्यात आले आणि आमची क्राइम ब्रँचची टीम बंगळुरूहून त्यांच्या मुंबईच्या घरी दाखल झाली आहे.’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

आदित्य अलवा कर्नाटकातील माजी मंत्री जीवराज अलवा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर कन्नड फिल्म इंडस्ट्रीत गायक आणि नट-नट्यांना कथित रुपाने ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या