Vivo चा V20 Pro 5G मोबाईल लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर

Vivo ने आज हिंदुस्थानात Vivo V20 Pro 5G मोबाईल लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 8 जीबीचा रॅम असून त्याची इनंटर्नल मेमरी 128 जीबी आहे. हा मोबाईल आजपासूनच विक्रीसाठी उपलब्ध असून त्याचे कॅमेरा फीचर जबरदस्त आहे.

या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा असून ट्रिपल रियर कॅमेरा आहे. या फोनमध्ये स्नॅपडॅगन प्रोसेसर असून हिंदुस्थानपूर्वी थायलंडमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला होता.

जबरदस्त फीचर

या फोनमध्ये 1080×2400 रिसोल्युशन असून हा फोन 6.44 इंच आहे. तसेच हा फोन फुल एचडी असून स्नॅड्रॅगन 765G SoC प्रोसेसर प्रकारचा प्रोसेसर आहे. या लेटेस्ट फोन अँड्रॉएडच्या 11 व्या वर्जन वर असून Funtouch OS 11 वर काम करतो.

कॅमेरा प्रेमींसाठी पर्वणी

या फोटोमध्ये तीन रियर कॅमेरांचा समावेश अहे. त्यात 64 मेगापिक्स्लचा प्रायमरी कॅमरीअ असून 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि एक दोन मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देणयत आला आहे. सेल्फीसाठी या कॅमेर्‍यात तब्बल 44 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा एक सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे.

 

बॅटरी फीचर

या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 33 वॅटच्या फ्लॅशने फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. यात 5 जी असून 4G LTE आणि वाय फायही आहे. तसेच या फोनची चार्जिंग वायर ही टाईप सी आहे. हिंदुस्थानात या मोबाईलची किंमत 29 हजार 990 इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या