भारीच की! 5000mAh बॅटरी अन् 128 जीबी स्टोरेज, Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च

Vivo कंपनीने वाय सिरिजमधील आपला नवा स्मार्टफोन Vivo Y51A हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. Vivo Y51A स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याची बॅटरी. कंपनीने या फोनसोबत 5000mAh ची बॅटरी दिली असून हा एक बजेट फोन आहे. तसेच या फोनचे देखील व्हिवोच्या अन्य स्मार्टप्रमाणेच ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ग्रेटर नोएडा येथील कंपनीत उत्पादन घेण्यात आले आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

वैशिष्ट्य –

– 6.58 इंचाचा फुलएचडी डिस्प्ले (2408×1080 पिक्सल रेजॉलूशन)
– क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर
– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज (मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येईल)
– टाइटॅनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी रंगात उपलब्ध

vivo-y51a-camera

कॅमेरा –

कंपनीने या फोनसोबत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी –

फोनला पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनचे वजय 188 ग्राम असून कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ओटीजी, यूएसबी टाइप-सी, ग्लोनास सारखे फिचर्स देण्यात आलेय.

vivo-y51a

किंमत –

Vivo Y51A ची किंमत 17 हजार 990 रुपये आहे. हा फोन व्हिवो इंडिया इ-स्टोअर, अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक आणि अन्य रिटेल स्टोअरवरून खरेदी करू शकता. एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या