खळबळजनक! रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी ‘त्याने’ घेतला पंगा, मुलींचे प्रायव्हेट फोटो केले व्हायरल

3450

जगातील शक्तिशाली देशांमध्ये रशियाचा समावेश आहे. त्यामुळे या देशाच्या प्रमुखांची अर्थात राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची सुरक्षा महत्वाची असल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती गुप्त ठेवली जाते. त्यांच्या कुटुंबियांचे खूप कमी फोटो प्रसारमाध्यमासमोर येतात. मात्र आता पुतीन यांच्या एका माजी सहकाऱ्याने थेट त्यांच्याशी पंगा घेतला आहे. जुनी खुन्नस काढण्यासाठी आणि बदल घेण्यासाठी या व्यक्तीने चक्क पुतीन यांच्या मुलींचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली. ‘डेली मेल’ने याबाबत वृत्त दिले आहे.

images-5

वृत्तानुसार, पुतीन यांची मुलगी मारिया आणि कॅटरिना यांचे प्रायव्हेट फोटो सदर व्यक्तीने व्हायरल केले आहेत. पुतीन यांना आधीच्या पत्नीपासून झालेल्या या मुली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो 1999 ला पुतीन यांनी पहिल्यांदा रशियात सत्ता मिळवली तेव्हाचे असल्याचे बोलले जात आहे. माजी अब्जाधीश सरजेई पुगाचेव यांनी पुतीन यांना त्रास देण्यासाठी मुद्दामहून हे फोटो प्रसिद्ध केल्याची चर्चा सुरू आहे.

images-7

सरजेई पुगाचेव (57) यांची गणना एकेकाळी पुतीन यांच्या खास जवळच्या लोकांमध्ये होत होती. 1999 ला पुतीन पहिल्यांदा राष्ट्रपती बनले तेव्हा सरजेई यांचेही यात मोठे योगदान होते. मात्र 10 वर्षांनी ते रशिया सोडून फ्रांसला गेले आणि त्या देशाचे नागरिकत्व घेतले. याच आठवड्यात रशियाविरोधात 10 हजार 824 कोटी रुपयांचा दावा ते हरले.

आपली प्रतिक्रिया द्या