विद्या मंदिर दहिसरला कबड्डीत अजिंक्यपद

135

सामना ऑनलाईन । मुंबई

दहिसर विधानसभा आयोजित सी. एम. चषक कबड्डी स्पर्धेत विद्या मंदिर, दहिसरच्या 17 वर्षांखालील कुमारी संघाने निर्विवाद अजिंक्यपद पटकावले. या विजयी संघाला आमदार मनिषा चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या संघाची कर्णधार अनिता शाक्री, उपकर्णधार चंचल राठोड, अनुजा जाधव, राधिका जाधव यांच्या अष्टपैलू खेळाने अंतिम लढत गाजली. सायली पवार, गायत्री मांडवकर, आचल मोरे, रिया भुवड, प्राजक्ता मते, हिमांशी म्हात्रे यांनीही झुंजार खेळ करत संघाला अजिंक्यपदापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.

vpm-girls

या संघाला विद्या मंदिर शाळेचे क्रीडा प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच विठ्ठल सुळे यांचे मोलाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचेही या संघाला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आपली प्रतिक्रिया द्या