लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

26
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

एका गंभीर दुखापतीच्या गुह्यात मदत करतो असे सांगून 20 हजारांची लाच मागितल्यानंतर त्यापैकी 10 हजारांची लाच घेणारे वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे (38) हे ट्रॅप झाले. सुनील (नाव बदललेले) हे इस्टेट एजंट असून त्यांच्या विरोधात वाकोला पोलीस ठाण्यामध्ये गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. या गुह्यात मदत करतो असे सांगत पिठे यांनी सुनीलकडे 20 हजारांची मागणी केली, परंतु लाच द्यायची नसल्याने सुनील याने ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार सुनीलकडून 10 हजारांचा हप्ता पिठे यांनी घेतल्यानंतर ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पिठे यांना पकडले. पिठे हे वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

आपली प्रतिक्रिया द्या