दररोज 15 किमी चाला; अमित शहा यांचा खासदारांना सल्ला

944

महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम 2 ते 31 ऑक्टोबरदरम्यान भाजपकडून चालवण्यात येणार आहे. या काळात देशातील प्रत्येक गावात पोहचण्याची भाजप नेत्यांची योजना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पक्षाच्या खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधत महात्मा गांधी यांच्या जयंतीबाबत पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी पक्षाच्या खासदारांना आपल्या मतदारसंघात दररोज 5 ते 15 किलोमीटर चालण्याचा सल्ला दिला.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेते 2 ते 31 ऑक्टोबरदरम्यान देशातील गावागावात पोहचणार आहेत. सुमारे अडीच लाख किलोमीटरचे अंतर ते चालणार आहेत. गावागावाशी संपर्क साधून महात्मा गांधींचे विचार जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात अमित शहा यांनी सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत विचार व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या