हिंदुस्थानातील सर्वात प्रतिष्ठेची आणि लोकप्रिय मॅरेथॉन असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणे प्रत्येक धावपटूचे स्वप्न असते. पण या मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्यामुळे हजारो धावपटूंना नावही नोंदवता येत नाही. पण ज्यांना धावायचेय अशा धावपटूंनी ताबडतोब नाव नोंदणी करावी. कारण मुंबई मॅरेथॉनची नाव नोंदणी सुरू झाली आहे. निराशा हाती पडू नये म्हणून धावपटूंना त्वरित आपल्या नावाची नोंदणी करता येईल. येत्या 20 जानेवारी 2025 ला मुंबई मॅरेथॉनची 20 शर्यत रंगेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून याची सुरुवात होईल.
मुंबईकरांना धावायला भाग पाडणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या मुंबई मॅरेथॉनने न थकता 19 वर्षांचा पल्ला गाठला आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनचे 20 वे वर्ष असून येत्या जानेवारीच्या 19 तारखेला, रविवारी 20 वी टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 ची दौड होणार आहे. 14 ऑगस्टपासून मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या धावपटूंना आपली नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी अर्ध लाखापेक्षा अधिक धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. यंदाही धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा आयोजकांकडून वर्तविण्यात आली आहे. www.tatamumedbaimedarathon.pedrocedamed.in या संकेतस्थळावर धावपटूंना आपली नोंदणी करता येणार आहे.