उबदार मैत्री

मैत्रिण  << स्वानंदी टिकेकर >>

तुझी मैत्रीण – केतकी चोडणकर.

ऊबदार मैत्री कशाला म्हणशील?- कुठल्याही परिस्थितीत, मन:स्थितीत असलात तरी जे नातं  तुम्हाला ऊब देतं ते नातं म्हणजे उबदार मैत्री.

मैत्रिणीसोबत थंडीतली एखादी आठवण – पुण्याला खूप थंडी पडते. तेव्हा रात्री कितीही वाजले तरी आणि तिचं ऑफिस कितीही लवकर असलं तरी आम्ही रात्री चहासाठी बाहेर पडतो.

मैत्रीचं नातं उबदार आहे, असं कधी वाटलं – पदोपदी. आमची खूप गंभीर भांडणं आणि मतभेद झालेत. पण एका क्षणानंतर आपल्याला जाणीव होते की, मैत्री ही मतभेद आणि भांडणांपेक्षाही महत्त्वाची आहे. एकमेकांसाठी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे.

थंडीत मैत्रिणीबरोबर खाल्लेला खाद्यपदार्थ – मॅगी.

तिचा पॉझिटिव्ह पॉइण्ट- मला कधीही कुठेही जायचं असेल तर माझ्यासाठी ती कायमच असते. ती मला कधीच असं म्हणत नाही की, मी तुझ्यासाठी वेळ देते तर तू माझ्यासाठी का वेळ देत नाहीस.

तिच्यातली आवडणारी गोष्ट – ती सगळ्यांचं मन राखते.

तिच्याकडून काय शिकता आले – शिस्त, व्यवस्थापन, नियोजन.

एकमेकांसाठी वेळ देता का – जेव्हा शूट नसतं तेव्हा मी पुण्याला जाते. त्यावेळी आम्ही भेटतो किंवा ती मुंबईला आली तर भेटतो.

तिची आवडती डिश – चाट.

ती डिस्टर्ब असते तेव्हा – मला फोन वा मेसेज करते.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण – दोन वर्षांपूर्वी जॉबनिमित्त केतकी अमेरिकेला गेली होती. 8-9 महिने आमचं बोलणं, भेटणं झालं नव्हतं. काही महिन्यांनी आम्ही मित्रमैत्रिणींनी तिला व्हिडीओ कॉल केला. सगळ्यांचं बोलून झाल्यावर, जेव्हा मी तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलायला लागले तेव्हा तिला बघून मला खूप रडू येऊ लागलं. तीही मला बघून रडायला लागली.

तू चुकतेस तेव्हा ती काय करते – जास्तीतजास्त वेळा मला माफ करून टाकते.

दोघींचे भेटण्याचे ठिकाण – पुण्याला माझ्या घराजवळ असलेल्या बरिस्तामध्ये आम्ही भेटतो.

भांडण झाल्यावर काय करता – पुन्हा बोलतो.

तिचे वर्णन – ती फॅशनबद्दल जागरूक असते. तिला ऑनलाइन शॉपिंगबद्दल चांगली माहिती आहे. त्यामुळे मी फॅशनच्या टिप्स तिच्याकडून घेत असते. अतिशय मेहनती आणि अतिशय प्रेमळ आहे ती. जिच्याशी मी कोणतीही गोष्ट शेअर करू शकते.

तुझी एखादी तिला न आवडणारी सवय – पटकन मन मोकळं करणे.