महाराष्ट्राचा दशरथ मांझी! गावकऱ्यांसाठी 22 दिवसांत खोदली विहीर

बिहारच्या दशरथ मांझी यांनी छिन्नी आणि हातोडय़ाच्या मदतीने भलामोठा डोंगर फोडून गावकऱयांसाठी रस्ता तयार केला होता. अशीच काहीशी घटना राज्यातील वाशीम जिल्ह्यात घडली आहे. गावातील वर्षानुवर्षांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी काशीमच्या रामदास पोफळे यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने अवघ्या 22 दिवसांत तब्बल 20 फूट विहीर खोदली आहे. पोफळे कुटुंबाच्या या उपक्रमामुळे आता गाककऱयांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे.

अडथळ्यानंतरही थांबले नाहीत

रामदास पोफळे म्हणाले, विहिरीच्या खोदकामादरम्यान माझी प्रकृती बिघडली होती. तरीही मी हिंमत सोडली नाही. प्रकृती ठीक झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात केली. विहिरीच्या बांधकामासाठीदेखील माझ्याकडे पैसे नव्हते. लोकांकडून कर्ज घेऊन मी विहीर बांधली आहे.

वाशीमच्या जामखेड गावचे रहिवाशी असलेले रामदास पोफळे यांचे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ते गुजरातमधील एका कापड कंपनीत ड्रायव्हरची नोकरी करतात. लॉकडाऊनमुळे मार्चपासून ते घरीच आहेत. सध्या त्यांच्या हाताला काहीच काम नाही. पोफळे यांच्या गावात पाण्याची खूप मारामार आहे. पाण्यासाठी गावकऱयांना काही किलोमीटर अंतर दररोज पायपीट करावी लागते. त्यामुळे लॉकडाऊनच्या रिकाम्या केळेत त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने विहीर खणण्याचे ठरवले. आपल्या वाढदिवशी म्हणजेच 1 मेपासून त्यांनी विहिरीच्या खोदकामाला सुरुकात केली. या कामात त्यांना पत्नी आणि दोन मुलांनी साथ दिली. अवघ्या 22 दिकसांत त्यांनी 20 फूट खोल विहीर खोदली आहे. विहिरीला आता बऱयापैकी पाणी लागले आहे. एकढय़ा पाण्यात पोफळे कुटुंबियांची पाण्याची गरज पूर्ण होईल. परंतु आता संपूर्ण गावातील पाण्याची समस्या मिटविण्यासाठी हे कुटुंबीय 40 ते 50 फूट खोल विहीर खोदणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या