
शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून बुधवारी उपरोधिक स्वरूपात भाजपची ‘वॉशिंग मशीन’ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांचे फोटो वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवती शहराध्यक्षा सुषमा सातपुते, प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, संदीप बालवाडकर, रूपाली पाटील, दयानंद इरकल, दीपक कामठे, गणेश नलावडे, आनंद सागरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध आरोप असणाऱया मंत्र्यांकडून स्वच्छ कारभाराची अपेक्षा ठेवायची का? आमदारांना भाजपच्या वॉशिंग पावडरने स्वच्छ केले असून ते आता मंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणार का? असा प्रश्न आंदोलकांनी विचारला. तसेच, भाजपने जनतेसोबत मांडलेला लोकशाहीचा बाजार बंद करावा. कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.