संमेलनाच्या दोन कोटींवर वॉच; शासनाच्या निधीसाठी साहित्य महामंडळाची समन्वय समिती

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने निधीत वाढ केली आहे. 50 लाखांवरून दोन कोटी रुपये एवढा निधी वाढवण्यात आला आहे. या निधीच्या समन्वयासाठी महामंडळाने समिती गठीत केली आहे. त्यामुळे  वाढलेल्या निधीवर आता वॉच राहणार आहे.

साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱयांची शनिवारी वर्धा येथे बैठक पार पडली. या बैठकीत निधीच्या समन्वयासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत महामंडळाचे तीन पदाधिकारी, साहित्य महामंडळाच्या घटक संस्थाच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे. ही समिती शासनाने दिलेल्या दोन कोटी निधीचा समन्वय साधणार आहेत.

संमेलनासाठी शासनाकडून मिळणाऱया दोन कोटींचा निधी कसा खर्च करायचा यांचा समन्वय ही समिती साधणार आहे. – मुंबई साहित्य संघाकडे साहित्य महामंडळ असल्याने त्यांचे समितीत तीन प्रतिनिधी असतील.

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून प्रा. मिलिंद जोशी, मराठवाडा साहित्य परिषदेकडून डॉ. दादा गोरे, विदर्भ साहित्य संघाकडून प्रदीप दाते समितीत असणार आहेत.