Video – तुंबलेल्या नाल्यात नगरसेवकाची उडी, कार्यकर्त्यांनी ‘नायक’ स्टाईल अंघोळ घातली

सामान्यत: एखाद्या नेत्याने तुंबलेला नाला पाहिला तर तो अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची खरडपट्टी करतो, तसेच कर्मचाऱ्यांना तो तात्काळ साफ करण्याचे आदेशही देतो असे आपण पाहिले आहे. मात्र राजधानी दिल्लीमध्ये एक वेगळेच चित्र दिसले.

आम आदमी पक्षाचे नगरसेवक हजीब अल हसन हे शास्त्री पार्कच्या दौऱ्यावर आले असता त्यांना एक नाला तुंबलेला दिसला. त्यांनी मागचापुढचा विचार न करता नाल्यामध्ये उडी घेतली आणि स्वत: साफसफाई सुरू केली. नेत्याचा हा अवतार पाहून कार्यकर्ते त्यांचा जयजयकार करू लागले. तसेच नाल्यातून बाहेर काढत त्यांना दुधाने अंघोळही घालतात. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)