सध्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. मानवा प्रमाणे याची झळ वन्य प्राण्यांना सुध्दा बसली आहे. जंगलातील तलावाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळें वन्य प्राणी गावात येऊन वन्य प्राणी व मनुष्य संघर्ष अनेकदा पाहायला मिळतो. त्यामुळे वन्य प्रण्यासाठी जंगलातच पाणी उपलब्ध झाले तर प्राणी गावात येणार नाहीत. त्यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पानवठ्यात 24 तास पाणी उपलब्ध असल्याने दिवसभर वन्य प्राणी याच पानवठ्यात बसून राहत असल्याचे दिसून येतात.