Water Cut : गुरुवार-शुक्रवार गोरेगाव ते बोरिवलीत पाणी नाही

76

सामना प्रतिनिधी । मुंबई

मालाड जलाशयाला जोडणाऱया जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी, 25 जुलै रोजी मध्यरात्रीपासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम शुक्रवारी 26 जुलै रात्रीपर्यंत पूर्ण होणार असल्यामुळे गोरेगाव ते बोरिवली भागात दुरुस्तीचे काम होईपर्यंत या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका जलअभियंता विभागाने दिली आहे.

या कामात मालाड जलाशयाला जोडणाऱया 2400 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी आणि 1500 मि.मी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येईल. या दुरुस्तीच्या काळात गोरेगाव पूर्व आणि पश्चिम भाग, मालाड पूर्व आणि पश्चिम भाग, कांदिवली पूर्व आणि पश्चिम भाग तसेच बोरिवली पश्चिम भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. तसेच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन जलअभियंता तथा उपायुक्त अशोककुमार तवाडिया यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या