नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी धुळेकरांची गर्दी

25

देवकपाशीतून पाण्याचे फवारे

सामना ऑनलाईन । धुळे

उन्हाळ्यात सर्वत्र टंचाई जाणवते. शहरात तीन ते चार दिवसाआड नळाला जेमतेम गरजेइतके पाणी येते. अशी परिस्थिती असताना धुळे शहरातील कुंभार खुंटाजवळ असलेल्या देवकपाशीच्या झाडातून मंगळवारी दुपारी पाण्याचे फवारे उडू लागले. जवळपास हंडाभर पाणी झाडातून उत्सर्जित झाले असावे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी जुने धुळे परिसरातील बहुसंख्य महिला-पुरुषांनी गर्दी केली होती.

सुभाष पुतळ्याकडून पुढे जुन्या धुळ्यात जाताना कुंभार खुंटावर देवकपाशीचे झाड आहे. या झाडाच्या खोडामधून दुपारी साडेअकराच्या सुमारास अचानक पाण्याचे फवारे उडू लागले. निसर्गाचा हा चमत्कार काहींच्या लक्षात आला. त्यांनी इतरांना सांगितले. परिणामी अल्पावधीत जुने धुळे परिसरातील महिला-पुरुष, तरुण-तरुणी एकत्र आले. काही तरुणांनी झाडाच्या खोडातून निघत असलेल्या चिळकांड्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी पुन्हा गर्दी उसळली.

आपली प्रतिक्रिया द्या