मोगलाई परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा!

सामना प्रतिनिधी, धुळे

शहरातील मोगलाई परिसरात आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिक कृत्रिम टंचाईला सामोर जात आहेत. नकाणे तलावात मुबलक पाणी असताना महापालिका प्रशासन हेतूतः कमी पाणीपुरवठा करत असल्याचा आरोप करीत मोगलाई परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

धुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांची ओरड असते. विशेषतः पाणीपुरवठा विभाग नागरिकांकडून लक्ष केला जातो. शहरातील अनेक भागात वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. अशीच तक्रार घेऊन शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ खरात महापालिकेत पोहोचले. शहराच्या इतर भागांत दोन-तीन दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. परंतु, मोगलाई भागात आठ दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिक पाणी साठवून ठेवतात. या साठविलेल्या पाण्यावर डासांसह इतर किटकांचा प्रार्दुभाव होतो. यामुळे मोगलाई परिसरात आरोग्याची समस्या वाढली आहे. नागरिकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत गेलेल्या नगरसेवक खरात यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकले.

नकाणे तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही मोगलाई परिसरावर अन्याय केला जात आहे. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी कामात कुचराई करत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते. महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी अपेक्षाही खरात यांनी यावेळी केली.

नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेनेच्या वतीने सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे, श्यामला दीक्षित, अलका गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे अर्ज दाखल केले. त्याप्रसंगी विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, आर. डी. धोंगडे, चंद्रकांत खाडे, श्याम साबळे, संतोष गायकवाड, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, चंद्रकांत लवटे आदी.