साताऱयातील 16 गावांसह 50 वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा; 18 हजार लोकांसह साडेतीन हजार जनावरांची सोय

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली आहे. जिह्यातील 16 गावे व 50 वाडय़ांमधील 18 हजार 540 नागरिक व 3 हजार 569 जनावरांची टँकरद्वारे तहान भागवली जात आहे. सुमारे 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी पाऊस लांबणीवर पडल्यास आणखी भीषणता वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात चांगलाच उन्हाळा जाणवत असल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. पारा 40 अशांच्या वर स्थिरावला आहे. प्रचंड उष्णतेमुळे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. विहिरी, नद्या, नाले, ओढय़ांतील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुतांश गावांनी टँकरची मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत संबंधित गावांचा सर्व्हे वरून टँकर सुरू करण्यात आले आहेत.

माण तालुव्यातील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, वारुगड, भाटवी ही 7 गावे व 43 वाडय़ांमधील 9 हजार 366 नागरिवांना 6 टँवरने पाणीपुरवठा होत आहे. अन्य तालुवानिहाय गावे व टँवरसंख्या अशी खटाव तालुव्यातील जायगावमधील 1 हजार 200 नागरिवांना एवा टँवरद्वारे पाणीपुरवठा वरण्यात येत आहे. वाई तालुव्यातील गुंडेवाडी, बालेघर अंतर्गत वासुर्डेवाडी, अनपटवाडी, मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी, मांढरदेव येथील 2 हजार 797 नागरिव व 1 हजार 199 जनावरांना 2 टँवरद्वारे पाणीपुरवठा वेला जात आहे. पाटण तालुव्यातील आंब्रुळवरवाडी व भोसगाव येथील 540 नागरिव व 130 जनावरांना एवा टँवरद्वारे पाणीपुरवठा वरण्यात येत आहे. महाबळेश्वर तालुव्यातील भीमनगर 856 नागरिव व 160 जनावरांना एवा टँवरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा तालुव्यातील आवाडवाडी परिसरातील 3 वाडय़ांमधील 624 नागरिव व 85 जनावरांना एवा टँवरद्वारे पाणीपुरवठा वेला जात आहे. वराड तालुव्यातील वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी, गायववाडवस्ती अशा 4 गावांतील 3 हजार 157 नागरिव व 1 हजार 995 जनावरांना 3 टँवरद्वारे पाणीपुरवठा वरण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली.

विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण

– कराड तालुक्यातील नाणेगाव बु., संजयनगर शेरे, मांगवाडी, अंधारवाडी, वाठार, अंतवडी, रिसवड, येवती, पाटण तालुव्यातील आंबुळकरवाडी भोसगाव, वाई तालुव्यातील वाई, मांढरदेव, येरूळी, कोरेगाव तालुव्यातील होलेवाडी, रणदुल्लाबाद, माण तालुव्यातील पिंगळी खुर्द, पिंगळी बु., खटाव तालुव्यातील बोंबाळे, निढळ, मांडवे, जायगाव, रेवलवरवाडी, मुळीववाडी, धवटवाडी, जाखणगाव, जांब, नांदोशी, महाबळेश्वर तालुक्यातील भीमनगर, आंब्रळ अशा 17 विहिरी व 15 कूपनलिका अधिग्रहण वेल्या आहेत.