हवाईपेक्षा जलमार्गाची वाहतूक परवडणारी

437

हवाई माल वाहतुकीचा खर्च प्रचंड असून शेतकरी उद्योजक व व्यापाऱ्यांना हा खर्च परवडणारा नाही. हा खर्च कमी झाल्यास देशांतर्गत निर्यातीसाठी माल वाहतूक परवडेल. यामुळे शक्यतो जलमार्गाने वाहतूक झाल्यास सोयीने आणि स्वस्त दरात होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

देशातील माल वाहतूकदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या क्षेत्रात प्रगतीच्या खूप संधी आहेत. त्यावर विचार करून मार्ग शोधता आला पाहिजे. मासेमारीची अर्थव्यवस्था आता आम्ही 1 लाख कोटीवरून 6 लाख कोटीपर्यंत नेणार आहोत. नागपूरची संत्रे, जळगावची केळी, बिहारमधील लिची या फळांची वाहतूक देशांतर्गत होऊ शकते. पण खर्च कमी केल्याशिवाय शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना ही माल वाहतूक परवडणे शक्य नाही.

तसेच यावर अभ्यास होणे आवश्यक असल्याचेही गडकरी म्हणाले. देशांतर्गत माल वाहतूक शक्यतो जलमार्गाने झाल्यास अत्यंत स्वस्त दरात होते. असे सांगून गडकरी म्हणाले, हवाई माल वाहतूक खर्च कमी होणार नाही तोपर्यंत या क्षेत्राचा आवाका वाढणार नाही. व्यापार वाढणार नाही. हे क्षेत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

प्रवासी विमानांचा वापर हवा…

फळे, भाज्या, फुले आणि मासे यांची देशांतर्गत हवाई माल वाहतूक शक्य झाली पाहिजे. प्रवासासाठी योग्य नसलेली अनेक विमाने नुसती पडून आहेत. त्या विमानांमध्ये बदल करून ती माल वाहतुकीसाठी मिळू शकतात काय, याचा विचार झाला पाहिजे. यासाठी मिळणारी परवानगी आणि प्रक्रिया या त्वरित करता आल्या पाहिजेत. तरच ते फायदेशीर ठरतील.

आपली प्रतिक्रिया द्या