सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता विवाह बंधनात अडकला, फोटो केला शेअर

18784

अभिनय, प्रभावशाली व्यक्तीमत्व आणि पिळदार शरीराने प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारा अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. WWE मध्ये भल्याभल्यांचा थरकाप उडवणारा ‘द रॉक’ अर्थात ड्वेन जॉन्सन याने दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या लॉरेन हॅशिअन (Lauren Hashian) हिच्याशी लग्न केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा खुलासा केला आहे.

हवाईमध्ये झालेल्या या अत्यंत खासगी विवाहसोहळ्याविषयी माहिती देत त्याने सुंदर फोटो शेअर केले. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये ड्वेन आणि लॉरेन शुभ्र पेहरावात दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगत आहे. ‘We do…’, असं लिहित त्याने लग्नाची तारीखही सर्वांसमोर आणली आहे.

2008 पासून रिलेशनशीपमध्ये

2006 मध्ये लॉरेन पहिल्यांदाच ड्वेनला भेटली होती. ज्यानंतर 2008पासून या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली. जवळपास तेरा वर्षांहून अधिक काळ एकत्र व्यतीत केल्यानंतर अखेर ड्वेन आणि लॉरेन यांनी त्यांच्या नात्याला नवे नाव दिले.

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

जागतिक स्तरावर सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत ड्वेन जॉन्सन याच्या नावाचा अग्रस्थानी समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सकडूनच याविषयीची माहिती देण्यात आली. तो ‘एचबीओ’च्या ‘बॉलर्स’ या एका शोसाठी प्रत्येक भागाचं $700,000 इतकं मानधन आकारतो.


View this post on Instagram

We do. August 18th, 2019. Hawaii. Pōmaikaʻi (blessed) @laurenhashianofficial❤️ @hhgarcia41

A post shared by therock (@therock) on

आपली प्रतिक्रिया द्या