एशिया पॅसिफिक बॉक्सींग स्पर्धेत विजेंदर सिंह विजयी

56

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा स्टार बॉक्सर (मुष्टीयोद्धा) विजेंदर सिंह याने माजी वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सिस चेका याला तीसऱ्या फेरीतच नॉक आऊट करून डब्लूबीओ एशिया पॅसिफिक स्पर्धा जिंकली. ही लढत सात मिनीटे चालली. विजेंदर सिंहचा हा सलग आठवा विजय आहे. त्यापैकी सात स्पर्धेत त्याने स्पर्धकाला नॉक आऊट केले आहे.

या लढतीपूर्वी विजेंदर सिंह याने ६ फेरींमध्ये चेका याला नॉक आऊट करणार असे सांगितले होते. मात्र चेका केवळ तिसऱ्या फेरीतच गारद झाला. पहिल्या फेरीपासूनच विजेंदरने जोरदार आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत विजेंदर पिछाडीवर होता. मात्र तिसऱ्या फेरीत विजेंदरच्या दमदार ठोशाने चेका गारद झाला. विजेंदरने मारलेल्या ठोशांमुले चेकाचा माऊथगार्ड पडला. यावेळी पंचाने ही लढत थांबविली.

विजेंदर सिंह आणि फ्रान्सिस चेका यांची लढत पाहण्यासाठी मुष्टीयोद्धा मेकी कोम, पहेलवान सुशील कुमार व त्याचे प्रशिक्षक सतपाल, योगेश्वर दत्त, केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयलस गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू, योगगुरु बाबा रामदेव यांच्यासह अनेक सेलिब्रीटी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या