शिवसेनेचे यश आम्हाला मान्य

42

सामना ऑनलाईन,ठाणे

हार ही हार असते आणि जीत ही जीत असते असे सांगतानाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश आम्हाला मान्य आहे, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेत ज्याला पूर्ण बहुमत असते त्याचा विजय असतो. ठाण्यात शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाल्याने हा पराभव आम्ही मान्य करीत आहोत. आमच्या चुका नेमक्या कोणत्या झाल्या याचा विचार करून राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करू, असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याची घोषणा 19 मार्चला करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

भाजपने सत्तेचा वापर केला

भाजपची महाराष्ट्रात व दिल्लीत सत्ता आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत या सत्ताधाऱयांनी आपल्या सत्तेचा आणि साधनसामग्रीचा पुरेपूर वापर केला, असे पवार म्हणाले. लष्कर भरतीचा पेपर फुटल्याच्या प्रकारावर पवार म्हणाले की, या परीक्षेवर  केंद्र सरकारचे नियंत्रण असते. यापूर्वी असे प्रकार कधीही घडलेले नाहीत. मात्र लष्कर भरतीचा पेपर फुटल्यामुळे  भाजपची मोठी नाचक्की झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या