कोण म्हणतो धोनीला हटवणार? तो तर वर्ल्ड कप खेळणार: रवी शास्त्री

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेटमधील भविष्यावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांनी वेगळी भूमिका मांडत धोनीला पाठिंबा दर्शवला आहे. धोनीचा सध्याच्या फॉर्म पाहाता त्याला संघातून बाहेर ठेवण्याचा विचार देखील करू शकत नाही, असे म्हणत धोनीच्या नावाचे त्यांनी जोरदार समर्थन केले आहे.

धोनीने श्रीलंका दौऱ्यात ८२.२३ स्ट्राईक रेटने १६२ धावा ठोकल्या आहेत. तर विकेटमागील चपळपणात त्याचा हात धरणं कोणाला शक्य नाही. धोनीचा संघातील सहकाऱ्यांशी असलेला संवाद, कठीण परिस्थितीतून संघाला जिंकून देण्याची त्याची क्षमता हे सारे बघता २०१९चा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीला पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

धोनी सारखा लेजंड कुठे मिळेल? धोनी हा सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्या बरोबरीचा आहे. त्यांच्या मेहनतीची आणि यशाची आपण कदर केली पाहिजे, असं म्हणत रवी शास्त्री यांनी धोनीचा सन्मान केला आणि धोनीचं वर्ल्ड कपमधील स्थान अढळ असल्याचं स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या