#AYODHYAVERDICT पाच एकर जमिनीचे दान नको- खासदार ओवैसी

2457
फाईल फोटो

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर निकाल दिला आहे. या निकालावर खासदार ओवैसी यांनी नाराजी दर्शवली आहे. न्यायालयाने देऊ केलेली पाच एकर जमिनीचे दान नको अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ओवैसी म्हणाले की “मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाप्रमाणे मी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी समहत नाही. सर्वोच्च न्यायालयाकडूनही चूक होऊ श्कते. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांना विश्वस्त नेमून मंदिर बनवण्याचे काम दिले आहे.”

जर तिथे मशीद असती तर सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला असता? असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला. आमचा हिंदुस्थानच्या संविधानावर विश्वास आहे. आमच्या अधिकारांसाठी आमचा लढा सुरू राहील. तसेच पाच एकर जमिनीचे दान आम्हाला नको असेही ते म्हणाले. मुस्लिम गरीब आहेत परंतु मशीद बनवण्यासाठी आम्ही पैसे गोळा करू असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या