संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…

70

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फुटीरवादी नेते म्हणतात की त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना पकिस्तानमध्ये जसे स्वातंत्र्य आहे तसे हवे का असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. कश्मीरमध्ये विकासकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

सिंह म्हणाले की, “ज्येष्ठ नेते फुटीरवाद्यांशी संवाद साधायला गेले परंतु त्यांनी बोलणे टाळले. कश्मीर प्रश्न नक्की सुटणार. हा प्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा इतरही आपल्याकडे इतरही मार्ग आहेत.” तसेच या फुटीरवाद्यांची मुले विदेशात शिकतात हे नेते इथल्या मुलांकडून दगडफेक करवून घेतात. तसेच हे नेते सारखे स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणत असतात. त्यांना नेमके कसले स्वातंत्र्य अपेक्षित आहे जे पाकिस्तानमध्ये आहे? २०३० पर्यंत हिंदुस्थान टॉप ३ प्रमुख देशात असेल. परंतु हे लोक देशाला मागे नेत आहेत. तसेच कश्मीर प्रश्न सुटणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या