‘सामना’चा अग्रलेख चिरंतन लिहीत राहू!

सामना ऑनलाईन, मुंबई

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभादेवीमधील सामनाच्या कार्यालयाजवळ घेतलेल्या सभेमध्ये दैनिक ‘सामना’वरील टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘सामना’ हे वर्तमानपत्र नव्हे तर शस्त्र आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. या शस्त्राची धार आजही कायम आहे. मोदी असो वा पवार, अन्यायावर वार करणारच! ‘सामना’मध्ये जे छापून येते ते खरेच असते. जनतेच्या हिताचे आम्ही लिहितो. लोकमान्य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ असे अग्रलेखातून म्हटले होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला होता. पण आम्ही टिळक नाही आणि तुम्हीसुद्धा इंग्रज नाही की दीडशे वर्षे राज्य कराल. पाच वर्षे तरी पूर्ण करून दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. स्वत:चे टीव्ही चॅनेल सुरू करण्याची आम्हाला गरज नसून ‘सामना’त जे येते तेच सर्व देशात जाते. कारण ते खरे असते आणि झोंबते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या