नेत्यानाहू-मोदी गळाभेट; ‘हे तर अति झाले’

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू सहा दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहेत. नेत्यानाहू नवी दिल्लीला पोहचले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व प्रोटोकॉल तोडत विमानतळाकर त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदींनी नेत्यान्याहू यांची गळाभेट घेतली. पंतप्रधानांच्या स्वागताच्या या खास अंदाजाची काँग्रेसने थट्टा केली आहे. काँग्रेसने एक व्हिडीओ ट्विट केल्याने राजकीय वॉर सुरू झाले आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘हग डिप्लोमसी’ची थट्टा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गळाभेटीला काँग्रेसने हे ‘खूपच अति’ आहे असे म्हटले आहे.

मोदींसाठी ‘खास’ गिफ्ट
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी मोदींसाठी इस्रायलकरून खास गिफ्ट आणले आहे. गेल्या वर्षी इस्रायल दौऱ्यावेळी मोदींना आवडलेली मोबाईल कॉटर प्युरिफिकेशन जीप नेत्यानाहू यांनी आणली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या