युद्धाने नाही तर चर्चेने डोकलाम प्रश्न सोडवू: सुषमा स्वराज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

युद्धाने प्रश्न सुटू शकत नाहीत. त्यामुळे चीनबरोबर युद्धाने नाही तर चर्चेने डोकलामचा प्रश्न सोडवू, अशी भूमिका आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मांडली. प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती हवी. आम्ही राजनैतिक पद्धतीने, धैर्याने आणि संयमाने डोकलामचा प्रश्न सोडविण्यावर भर देत आहेत, असे स्वराज यांनी स्पष्ट केले.

परराष्ट्र धोरण आणि मित्रराष्ट्रांबरोबरचे संबंध यावर आज राज्यसभेत वादळी चर्चा झाली. विरोधकांनी मांडलेले मुद्दे आणि आरोपांना परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी उत्तरे दिली.

राहुल गांधींना फटकारले

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या राजदूतांची भेट घेतली होती. याचा संदर्भ देऊन सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना फटकारले. या वादाबाबत सरकारने सर्वांनाच माहिती दिली होती. पण विरोधी पक्षाचे नेते चीनच्या राजदूतांना भेटले, असे स्वराज म्हणाल्या.

दहशतवाद थांबविला तरच पाकशी चर्चा
पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबविल्या तरच त्यांच्याशी चर्चा करू. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवादी हल्ले थांबवा, चर्चेचे दरवाजे खुले करू, असे परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या