हवामानाची चर्चा करताना हवा सुटली, बातमीदाराची बातमी झाली

पाश्चिमात्य देशांमध्ये हवामानाचे वृत्त हे अत्यंत गांभीर्याने दिले जाते. बहुसंख्य वृत्तवाहिन्यांमध्ये हवामानाशी निगडीत बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी विशिष्ट वेळा ठरलेल्या असतात. त्यासाठी तज्ज्ञ अँकरमंडळीही असतात. अमेरिकेतील केंटुकीमध्ये WDRB नावाची वृत्तवाहिनी आहे. यामध्ये मार्क बिनबर्ग अँकर म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत झालेला एक प्रकार दर्शकाने मोबाईलवर रेकॉर्ड केला आहे.

19 जानेवारीला मार्क हवामानाची बातमी देत असताना जॉर्डन नावाच्या एका प्रेक्षकाने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. मार्क यावेळी डेस मोईन्स भागातून थंड हवा वाहात असल्याचं सांगत होता. हे सांगितल्यानंतर त्याने एक क्षण थांबून कॅमेऱ्याकडे बघितलं आणि टाचा उंचावून एक विचित्र आवाज काढला. हा आवाज तोंडातून आला नव्हता असं ही बातमी पाहात असलेल्या जॉर्डनला ठामपणे वाटलं होतं.

जॉर्डनने ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला इंडिपेंडट आणि NBC या वृत्तसंस्थांनी हा व्हिडीओ आम्ही वापरू शकतो का अशी परवानगी विचारली होती, ज्याला त्याने तत्काळ होकार दिला.