राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात अनुवाद विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

जालना जिल्ह्यातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात अनुवाद या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबीनारमध्ये भाषा, अनुवाद तज्ज्ञ सामील होणार आहेत अशी माहिती महाविद्यालयातील इंग्रजीच्या विभागप्रमुख ज्योती धर्माधिकारी यांनी दिली आहे.

लॉकडाऊन असला तरी अनेक शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी ऑनलाईन माध्यमातून आपले वर्ग सुरू ठेवले आहे. शिक्षकांनी लॉकडाऊनचा काळ सत्कारणी लावला असून आपल्या ज्ञानात भर घातली आहे. महाविद्यालयाच्या प्रा. अलका नाथ्रेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयाने अनुवाद विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक, गुजरातमधील केंद्रीय विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी अधिष्ठाता इ.व्ही रामकृष्णन हे बीज भाषण करणार आहेत. तर अनुवादाविषयी इंग्रजीचे तज्ज्ञ, विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास परिषद,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरचे माजी संचालक प्राध्यापाक  ए. जी. खान मार्गदर्शन करणार आहेत.

या वेबिनारचे लाईव्ह प्रक्षेपण कॉलेजच्या फेसबुक पेजवरून लाईव्हद्वारे होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या वेबिनारमध्ये सामील होण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके आणि संयोजक डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या